शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक
अनिल ठाणेकर
ठाणे : शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता अनिल महाडिक यांनी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांकडे केली आहे.
जिल्ह्यातील सर्व कार्यालय एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार , जिल्हा परिषद, कामगार उपायुक्त, धर्मदाय  सहाय्यक आयुक्त,  रेशनिंग कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन महानगरपालिका  कार्यालय ,व सर्व प्रभाग समिती, सार्वजनिक हॉस्पिटल ,जिल्हा/ ठाणे शहर सहकारी संस्था निबंधक* आपणास सविनय अर्ज सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ फेब्रुवारीला विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या कार्यालयात खालील बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, शासनाचा हा निर्णय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी, आपल्या स्तरावरून या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तशी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, असे. अभिप्राय पेटीची स्थापना: कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी. शासन निर्णयासोबत जोडलेले अभिप्राय प्रारूप पेटीच्या शेजारी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांना गुणांकण देणे सुलभ होईल.कार्यवाही व अहवाल: प्राप्त झालेल्या विधायक सूचनांचे स्थानिक आणि धोरणात्मक असे वर्गीकरण करून त्यावर तात्काळ सुधारणात्मक पावले उचलण्यात यावी, अशी सूचना अनिल महाडिक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *