शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा
कल्याण : शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय, बी.एड., शहाड विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुल सजावट, नेल आर्ट स्पर्धा, हेअर स्टाईल स्पर्धा तसेच फूड स्टॉल (खाद्य मेळावा) या उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्या वैशाली पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. कल्पना सोमनाचे, प्रा. बबन पाटील, प्रा. अनघा चौधरी, प्रा. डॉ. सुस्मिता म्हाळुंकर, प्रा. योगिनी घरत, ग्रंथपाल प्रा. अनघा मोडक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता व कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
