चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या मशालीवर भाजपचे कमळ फुलले

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तानाट्याचा अखेर सनसनाटी झाला. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही असे सकाळच्या पत्रकार परिषदेत ठासून सांगणाऱ्या संजय राऊतांचे शब्द हेवेत विरत नाही तोच ठाकरेंच्या सेनेने चंद्रपुरमध्ये भाजपाचा महापौर बनवित उपमहापौर पदरात पाडून घेतले. अखेर ठाकरेंच्या मशालीवरच भाजपाचे कमळ फुलल्याचे मिम्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव विजयी झाले आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय. तर काँग्रेस हायकमांडकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *