– इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजय
मुंबई: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत (२०२५-२६) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सवर १४ धावांनी विजय मिळवला.
क्रॉस मैदान येथील युनायटेड क्रिकेटर्स ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. त्यात विश्वास कृष्णाने (५८ चेंडूंमध्ये ८९ धावा) सर्वाधिक योगदान दिले. त्याला राजू मोरे (३४ धावा) आणि केतन पायनने (२५ धावा) चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल, इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स संघाला २० षटकांत २ बाद १३९ धावा करता आल्या. त्यांच्याकडून रितेश पुजारीसह (४४), अंकित शास्त्री (३९ धावा) आणि प्रेम मेहताने (३४ धावा) चांगली चुरस दिली. मात्र, केतन डांगेसह (२/१३) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अन्य गोलंदाज सरस ठरले.दुसऱ्या सामन्यात, युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाचा ९ विकेट राखून पराभव केला.
तत्पूर्वी, प्रमुख पाहुणे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उन्मेष खानविलकर, ओरिएंटल इन्शुरन्सचे डीजीएम मिलिंद तेंडुलकर आणि सुनीता इंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, नितीन पाटील आणि तरुण बोस आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया – २० षटकांत ५ बाद १५३(विश्वास कृष्णा ८९ (५८ चेंडू), राजू मोरे ३४, केतन पायन २५; प्रभात टी. २/२६) वि. इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स – २० षटकांत २ बाद १३९(रितेश पुजारी ४४, अंकित शास्त्री ३९, प्रेम मेहता ३४; केतन डांगे २/१३). निकाल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा १४ धावांनी विजयी.
मुंबई पोर्ट ट्रस्ट – १७.१ षटकांत सर्वबाद ७८(काशिफ अन्सारी ३/१६, पार्थ दर्गी २/२, शुभम गिरी २/१३) वि. युनायटेड पटणी इंडस्ट्रीज – ६.५ षटकांत १ बाद ७९(यश धुरी ३२*, अरहान एम. २५). निकाल: युनायटेड पटणी इंडस्ट्रीज ९ विकेट राखून विजयी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *