महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पदभार सांभाळला
पत्राद्वारे अनधिकृत बांधकामाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश
अरविंद जोशी
मिरा-भाईंदर
आज ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी महापालिकेत येऊन आपल्या दालनाचे उदघाटन करत पदभार सांभाळाला. यावेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, भाजपा अध्यक्ष दिलीप जैन तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
७८ नगरसेवक निवडून बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या कामकाजाला सुरुवात केली. महापौर डिपंल मेहता यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला असता, त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांना तसेच उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांना भेटण्यासाठी मोठी झुंबड उडाली.
यावेळी महापौर मेहता यांनी त्यांचे पहिले पत्र आयुक्ताना दिले. शहरात एकही अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी झिरो टोलरन्स पॉलिसी राबवावी अशी सूचना त्यांनी त्यात केली आहे. अनधिकृत बांधकामा संदर्भात वॉर्ड ऑफिसर आणि अधिकारी यांच्यावर कारवाई सुद्धा करावी असे त्यांनी त्यात सुचवाले आहे. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की शहराच्या विकासासंदर्भात आणि जनतेच्या प्रश्नावर त्या काम करत राहणार आहेत.
