लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार:

एपस्टीन फाईलवरून सभागृहात गोंधळ

नवी दिल्ली : एपस्टिन फाईलच्या दबावाखाली पंतप्रधान मोदी असून त्यामुळेच भाजपाने देश अमेरिकेला विकला असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आणि संसदेत एकच गदारोळ झाला. एपस्टिन फाईलचे पुरावे सभागृहाला द्या असे आव्हान भाजपाचे संसदीय मंत्री किरण रिजूजीने राहुल गांधीना दिले आणि तेच अडचणीत आले. रिजूजीने केलेल्या या चुकीचा पुरेपुर फायदा उठवत राहुल गांधी एफस्टिनचे पुरावे पटलावर ठेवण्याच प्रयत्न करताच सभापती असणाऱ्या जगदंबिका पाल यांनी आपण पुरावे मागितलेच नसल्याचे सांगून पुराव स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल. जेफ्ररी एपस्टिन याने लहान मुलींचे लैंगिक शोषण करीत जगभरातील अनेक दिग्गजांना त्यात सामिल करून घेतल्याचा आरोप आहे.

एपस्टिनसोबतच्या पत्रव्यव्हारात भाजपाचे मंत्री हरदिप पुरी आणि उद्योजक अनिल अंबानींचेही नाव आहे. राहुल गांधी यांनी आज या सगळ्यांवर हल्लाबोल केला.

भाजपाने भारत विकला आहे. तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली आहे, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, मला माहित आहे की पंतप्रधान सामान्य परिस्थितीत भारत विकणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी भारत का विकला? कारण ट्रम्प त्यांचा गळा दाबत आहेत. त्यांनी त्यांचा गळा दाबला आहे. पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती आपल्याला दिसते.असा आरोपही त्यांनी केला.

राहुल म्हणाले, केंद्र सरकारने व्यापार करारात गरीब शेतकऱ्यांना चिरडण्याचा मार्ग मोकळा केला आहे; यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी असे केले नाही. इतिहासात पहिल्यांदाच, आमचे शेतकरी संकटाचा सामना करत आहेत. अमेरिकेची आयात ४६अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून १४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढेल. आमचे शुल्क ३ वरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे आणि त्यांचे शुल्क १६ टक्क्यांवरून शून्य झाले आहे.” महासत्ता राहण्यासाठी अमेरिकेला भारतीय डेटाची आवश्यकता आहे असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचे हे अमेरिका ठरवेल का? राहुल म्हणाले, जर अमेरिकन लोकांना महासत्ता राहून त्यांच्या डॉलरचे रक्षण करायचे असेल, तर भारतीय डेटा महत्त्वाचा आहे. आपली लोकसंख्या ही एक ताकद आहे, त्या ताकदीचा वापर करण्यात मोदी  अपयशी ठऱले असा आरोपही गांधी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *