उच्च न्यायालयाचे मल्याला अल्टीमेटम
मुंबई : भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या विजय मल्याला आज मुंबई हायकोर्टाने भारतात परतण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. विजय मल्या याने भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून तो भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी त्याला शेवटची संधी दिली.
मध्यसम्राट मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त इशारा देताना स्पष्ट केले.
भारतात कधी परतणार किंवा भारतात परणार आहात की नाही ? याबाबत मल्याला प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश याआधी न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा मल्याला तो भारतात आल्यावरच त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.
मल्ल्याला फरारी घोषित केल्यानंतर आणि लंडनमध्ये प्रत्यार्पणाची कार्यवाही प्रगतीपथावर असतानाच त्याने एफईओएला आव्हान दिल्याचा युक्तिवाद केंद्र सरकारच्या वतीने महाअभिकर्ता तुषार मेहता यांनी केला. दुसरीकडे, कायद्याचे स्वरूप पाहता, मल्या हा प्रत्यक्ष भारतात परतल्याशिवाय त्याची बाजू ऐकली जाऊ शकते, असा दावा त्याच्या वतीने वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद थोडक्यात ऐकल्यानंतर मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.
