महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोळी समाजाची संस्कृती व खाद्यपदार्थांची ओळख
ठाणे: कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या कोळी महोत्सवाला यंदा सलग १४ व्या वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभागी होण्याचा आनंद लुटला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महागिरी कोळीवाडा कोळी समाजाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या महोत्सवाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, भाजपाचे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, संजय तरे यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना कलांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच खवय्यांना कोळी समाजातील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *