राहुल गांधींची खासदारकी रद्द रण्यासाठी मोर्चेबांधणी

भाजपा खासदार निशिकांत दुबेंच खाजगी प्रस्ताव

 निवडणूक लढण्यास कायमची बंदी घाला

नवी दिल्ली : अमेरिका ट्रेड, मेजर जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रात चीनची झालेली घुसखोरी आणि एप्स्टिन फाईलमधिल भारतीय राजकारण्यांची आलेली नावे यामुळे संसद दणाणून सोडणाऱ्या राहुल गांधींची खासदारकीच रद्द करण्यासाठी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभेत देशाची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवत दुबे यांनी राहुल गांधींना निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी घालावी अशी खाजगी प्रस्तावात मागणी केलीय.

 दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. दरम्यान भाजपाने कितीही शक्ती खर्ची घातली तरी मला ते सत्य सांगण्यापासून रोखू शकत नाही अशी प्रतिक्रीया यावर राहुल गांधी यांनी दिली.

‘देशाला धोका असणाऱ्या जॉर्ज सोरोस या शक्तींच्या मदतीने राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे’, अशी माहिती दुबे यांनी दिली. जॉर्ज सोरोस हे हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत. जॉर्ज यांनी जगभरात उदारमतवादी विचारांना पाठिंबा दिल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या संघटना करतात.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’  मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *