महाशिवरात्री निमित्त ठाण्यात वाहतुक बदल

ठाणे :  येत्या १५ फेब्रुवारी रविवारी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री निमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. ठाण्यातील बाजारपेठेत कौपिनेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्रिच्या दिवशी ठाण्यासह विविध शहरातून भाविक मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बदल लागू केले आहेत. बाजारपेठेत वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी लागू केली असून पर्यायी मार्गाने येथील वाहतुक वळविण्यात आली आहे. बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी असेल.हे वाहतुक बदल रविवारी पहटे ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *