२७ जानेवारीच्या घटनांवरून राजकीय आरोपांना आनंद परांजपे यांचा तीव्र निषेध

‘अजितदादांसोबत उभे राहिलेले खरे कुटुंब’

ठाणे दि. १३ फेब्रुवारी – कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही तर २ जुलै २०२३ मध्ये जी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर अजितदादांसोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंब होते अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच होणार्‍या वक्तव्याने क्षणभर विचार करा की, या सगळ्यांमुळे अजितदादा पवार यांच्या कुटुंबावर किती आघात, किती वेदना त्यांना होत असतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपला उद्वेग आणि संताप व्यक्त केला.

ठाणे येथे आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर पक्षाची भूमिका आणि होणार्‍या आरोपावर सडेतोड बाजू मांडली. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर जी काही वक्तव्ये काही दिवसांपासून केली जात आहेत, त्याच्यामागे असलेल्या मार्गदर्शकाचादेखील पक्षाच्यावतीने आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात खडेबोल आनंद परांजपे यांनी सुनावले आहेत.

अजितदादांच्या दु:खद निधनानंतर अंत्यविधी होण्याआधीच विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्यावेळी टाळली गेली पाहिजे होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मांडली होती.जो अपघात झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही पहिल्या दिवसापासून केली आहे. टाईम बॉम्ब चौकशी व्हायला हवी आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांनी जे मांडले त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. ऐनवेळी कॅप्टन बदलले याचीदेखील चौकशी व्हायला हवी.घात होता की अपघात हेही तपासातून समोर यायला हवे. मात्र २७ जानेवारीच्या घटनाक्रमाबाबत राजकीय बोलले गेले त्याबद्दल आम्ही मान्य करणार नाही मात्र २८ जानेवारीबाबत त्यांनी जे प्रश्न निर्माण केले आहे त्या घटनाक्रमाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी करतानाच दादांच्या जाण्याने आम्हांला आधार देणारी मायमाऊली सुनेत्रा पवार याच आहेत हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले.

सुनेत्राताई पवार यांची विधीमंडळ पदी निवड झाल्यानंतर त्या सर्व आमदाराची भेट घेणार आहेत शिवाय सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत बसून चर्चाही करतील.मात्र २७ जानेवारीच्या घटनाक्रमाला जो काही राजकीय रंग रोहित पवार यांच्याकडून आरोप करुन देण्यात येत आहे त्याचा आनंद परांजपे यांनी निषेध केला आहे.

रोहित पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले. ८ वाजून ४४ पर्यंत विमान अपघात झाला. त्यांनी RO पायलट यांचा विषय काढला या सर्वांची चौकशी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच या प्रकरणावर कोणत्याही प्रकाराचे राजकारण करू नये.चौकशी चालू आहे त्यानंतर निष्कर्षावर येऊ. चौकशीमध्ये सर्व समोर येईल vsr मध्ये कशाप्रकारे इंजिन मेन्टेन करण्यात येत होते.विमान उडण्यास सक्षम होते का? हे समोर येईल अजित दादांना जे गमावले आहे ते जाणण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *