राज्य माहिती आयोगाचा जनसेवा शिक्षण संस्थेला दणका
खुलासा करा अन्यथा दंड भरा
राजीव चंदने
मुरबाड : संस्थेची माहिती टाळण्यासाठी माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी पदावर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणुक न करता हि पदे संस्थेचे सहसचिव- भास्कर हरड व सचिव -पांडुरंग कोर , यांनी बळकावुन माहिती नाकारल्या प्रकरणी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश जाधव यांनी दाखल केलेल्या अपिल क्र.के.आर.२५४५/२०२३ चा युक्तिवाद करताना जनसेवा शिक्षण संस्था , मुरबाड च्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त करत माहिती अधिकार अर्जातील माहिती नाकारल्या प्रकरणी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी खुलासा सादर करा.अन्यथा दंड भरा अशी नोटीस पाठवली असल्याने जनसेवा शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.
मुरबाड जनसेवा शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर हरड व सचिव पांडुरंग कोर हे पदाधिकारी आहेत. हे दोन्ही अधिकारी समाजातील प्रतिष्ठित नागरीक आहेत. शालेय शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे ते विना मोबदला सेवा देत आहेत. त्याचसोबत जन माहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलिय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा पदाधिका-यांकडून माहिती अधिकार अधिनियामाची पगारी कर्मचा-यांपेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा असताना या दोन्ही पदाधिका-यांनी एक प्रकारे संगनमत करून अपिलार्थी प्रकाश जाधव यांना माहिती देण्यास कुचराई केली आहे व माहिती जाणीवपूर्वक नाकारली आहे. समाजातील या प्रतिष्ठित व्यक्तींकडून आयोगाला निश्चितपणे ही अपेक्षा नव्हती.
अपिलार्थी यांनी एकदा माहिती मागण्याचा अर्ज केल्यावर त्यांनी १५ दिवसांत पुन्हा अर्ज करावा असे आदेश प्रथम अपिलिय अधिकारी का देतात हे त्यांच्या आदेशावरून स्पष्ट होत नाही. मात्र, जन माहिती अधिकारी यांना याची पूर्ण जाणीव होती की, अपिलार्थी यांनी आपल्याकडे कायद्यानुसार विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कायद्यामध्ये तशी कोणतीही तरतूद नाही असे असतानाही जन माहिती अधिकारी असा युक्तिवाद कसा करू शकतात याचे खरोखरच आयोगाला आश्चर्य वाटते. या प्रकरणातील एकूणच परिस्थिती पाहता जन माहिती अधिकारी यांनी जाणीवपूर्वक अपिलार्थी यांना माहिती नाकारली आहे असे दिसून येते. सबब, तत्कालीन व विद्यमान जन माहिती अधिकारी भास्कर रामचंद्र हरड, सहचिटणीस, जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांनी अपिलार्थी यांना माहिती पुरविण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याने अपिलार्थी यांना माहिती मिळण्यास झालेल्या विलंबाबद्दल विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी जन माहिती अधिकारी भास्कर रामचंद्र हरड, सहचिटणीस, जनेसवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांचेवर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत २० (१) अन्वये प्रति दिवस रु.२५०/- (अधिकतम रु.२५,०००/-) इतक्या शास्तीची आकारणी का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा जन माहिती अधिकारी भास्कर रामचंद्र हरड, सहचिटणीस, जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांनी पुढील सुनावणीस आयागाकडे स्वतः उपस्थित राहून सादर करणे उचित होईल. प्रस्तुत प्रकरणी पुनश्चः सुनावणी घेण्यात येईल,
!! जन माहिती अधिकारी तथा सहचिटणीस, जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांनी अपिलार्थी यांनी मागणी केलेली संपूर्ण माहिती पुढील १५ दिवसात शीघ्र टपालाने निःशुल्क पुरवावी. जी माहिती उपलब्ध नाही त्याबाबत मुद्देनिहाय स्पष्ट व विविक्षित उत्तर अपिलकर्ता यांना १५ दिवसांत पाठवावे!!
!! जन माहिती अधिकारी भास्कर रामचंद्र हरड, दिनांक १९.१०.२०२२ रोजीच्या माहिती अर्जाला अनुसरुन जाणीवपूर्वक विलंब केला असल्याने त्यांचेवर माहितीचा हरड, सहचिटणीस, जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांनी अपिलार्थी यांच्या अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत २० (१) अन्वये प्रति दिवस रु. २५०/- (अधिकतम रु.२५,०००/-) इतक्या शास्तीची आकारणी का करण्यात येऊ नये, याचा लेखी खुलासा त्यांनी आयोगाकडे दि.२४.२.२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता स्वतः उपस्थित राहून सादर करावा,अशी नोटीस बजावली आहे.
