Month: February 2026

बालमोहन शाळेचा‌‌ मोठा विजय ‌

माटुंगा ढाल क्रिकेट स्पर्धा बालमोहन शाळेचा‌‌ मोठा विजय ‌ मल्हार करंडेचा शानदार अष्टपैलू खेळ मुंबई. ..एम.जी .एस. एम ने आयोजित केलेल्या , माटुंगा ढाल   क्रिकेट स्पर्धेत,पहिल्या फेरीत  बालमोहन विद्या मंदिर इंग्लिश  सीबीएसई  शाळेने  आय.ई.एस.मुलुंड शाळेचा ३०९ धावांनी दणदणीत पराभव केला.अष्टपैलू खेळ करणारा मल्हार करंडे त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. बालमोहन विद्या मंदिर शाळेने ३७० धावांचे मोठे  आव्हान आय.ई.एस.  मुलुंड शाळेसमोर   विजयासाठी ठेवले. होते. बाल मोहनच्या मल्हार करंडे याने ९८ चेंडूत ११३  नाबाद धावा ‌ केल्या. त्याला  स्मित ठाकूरने ४२ धावा आणि विवान रेडकरने ३६ धावा करुन  चांगली साथ दिली. आय.ई.एस.मुलुंड शाळेचा डाव  ६१ धावांमध्येच संपुष्टात आला.मल्हार करंडेने सुरेख अष्टपैलू खेळ करीत ४ बळी देखील टिपले.त्याला अथर्व कासारे , वेद खांबेटे  आणि स्वराज साठे यांनी प्रत्येकी  २ बळी घेऊन छान साथ दिली.

के श्रीनिवासन विजयी तर अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीला १ लाखाची मदत

महाराष्ट्र ओपन कॅरम स्पर्धा के श्रीनिवासन विजयी तर अपंग कॅरमपटू जगन्नाथ मैत्राणीला १ लाखाची मदत मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे संपन्न झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीच्या विजयाची माळ तेलंगणाच्या के श्रीनिवासच्या गळ्यात पडली. अंतिम फेरीत या विश्व् विजेत्या कॅरमपटूने महाराष्ट्राच्या अभिषेक चव्हाणवर अटीतटीच्या लढतीत ९-२०, २३-०, २५-४ असा विजय मिळवला. उप उपांत्य सामन्यात अभिषेकने आंतर राष्ट्रीय खेळाडू उत्तर प्रदेशच्या महम्मद आरिफवर १३-१०, १५-१७ व २४-० असा अनपेक्षित विजय मिळवल्यामुळे अंतिम फेरीत तो काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सामन्यात महाराष्ट्राच्या अभिषेकने सुरुवात अतिशय छान केली होती. परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. दुसरा सेट व तिसऱ्या सेटमध्ये त्याचे सर्व डावपेच निष्प्रभ ठरले. पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या के श्रीनिवासन आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर अंतिम विजय मिळवून चॅलेंजर्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले व १ लाख ५० हजारांचे ईनाम पटकावले. तर अभिषेकने १ लाखाची कमाई केली व द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, मड जीन्स व बार्बेक्यू नेशन सहपुरस्कृत केलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा महमंद आरिफ वरचढ ठरला. त्याने महाराष्ट्राच्या चांद युसूफ शेखला १७-८, १६-१२ असे रोखले आणि ७५ हजारांचे बक्षीस व चषक मिळवला. तर चौथ्या क्रमांकावर समाधान मानलेल्या चांदला ५० हजारांचे बक्षीस मिळाले. उपउपांत्य फेरीत पराभूत झालेल्याना प्रत्येकी २५ हजारांनी गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील एकंदर ३२ खेळाडूंना मिळून ८ लाखांची रोख पारितोषिके देण्यात आली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी की श्रीनिवासन चांद युसूफ शेखचा १८-१०, २५-६ असा फडशा पडला होता. भाग घेतलेल्या पूर्व कॅरमपटूंनी साहित्य पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम व बुलेट शॉट सोंगट्यांवर एकंदर २३ व्हाईट स्लॅम व १८ ब्लॅक स्लॅमची नोंद केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून स्पर्धेच्या २ दिवसात अंतिम फेरी सहित एकंदर ३१ सामने सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. शिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून महत्वाच्या सामन्यांचे धावते समालोचन करण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या विजेत्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष गोपाळ शेलार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे दादर पश्चिम शाखेचे प्रमुख वासुदेव मुखर्जी, सिस्का कॅरम कंपनीचे प्रमुख अतुल मेहरा, यु एस कॅरम फेडरेशनचे अध्यक्ष अतुल भावे, मड जीन्सचे अजगर शेख, आंध्र महासभा जिमखान्याचे सचिव वेंकटेश, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांच्या हस्ते पहिल्या चार खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. तर इतर विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष, धनंजय साठे, यतीन ठाकूर, प्रदीप भाटकर  व सहसचिव केतन चिखले यांनी बक्षिसे दिली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रसन्ना संत यांनी केले. कॅनडा, श्रीलंका व मालदीवच्या खेळाडूंचा कॅरम चे घड्याळ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचा अपंग कॅरमपटू जग्गनाथ मेत्राणी गेली ४० वर्षे सातत्याने सर्व स्पर्धांमध्ये भाग घेत असून त्याच्या या चिकाटीला सलाम म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने त्याचा या समारंभात १ लाख रुपयाचा धनादेश देऊन विशेष सन्मान केला. जगन्नाथ मैत्रणीला एक हात नसून दुसऱ्या हाताला फक्त एक करंगळी आहे. या एका करंगळीच्या जोरावर तो गेली अनेक वर्षे कॅरमचा आनंद लुटत असून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

महाराष्ट्राची दणदणीत सलामी!

३५ वी किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राची दणदणीत सलामी! कुमार–कुमारी गटात विजयाचा जल्लोष कुरुक्षेत्रच्या मैदानावर महाराष्ट्राची विजयी झलक हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील थीम पार्क मैदानावर सुरु झालेल्या ३५ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि भक्कम संरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्राने साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत स्पर्धेत आपली विजयाची दावेदारी निर्माण केली. किशोरी गट : महाराष्ट्राची आंध्रप्रदेशवर एकतर्फी मात किशोरी गटातील एका सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सामना आपल्या बाजूने झुकवला. महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर एक डाव ३४ गुणांनी ४२–८ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राकडून पियुषा पानमाळकर (३.१० मि. संरक्षण), अपर्णा वर्दे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (२.५० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (२.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. आंध्रप्रदेश कडून एस. मीना हिने एकाकी प्रतिकार केला. किशोर  गट : पश्चिम बंगालची उत्तर प्रदेशवर काठावरची सरशी दुसऱ्या किशोरी सामन्यात पश्चिम बंगालने उत्तर प्रदेशवर ५ गुण व २ मि. ५ सेकंद राखून ३९–३४ असा थरारक विजय मिळवला. पश्चिम बंगालकडून अमृता दास (१.३५ मि., नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), अनुषा मंडल (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), कुकु माझी (१ मि. व १.४० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. उत्तर प्रदेशकडून आरोही कुमारी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), साक्षी कुमारी (१ मि. संरक्षण व १२ गुण) यांनी झुंज दिली. किशोर गट : महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय किशोर गटातील सामन्यात महाराष्ट्राने पॉंडेचेरीवर २१ गुणांनी ३५–१४ असा स्पष्ट विजय मिळवला. महाराष्ट्राकडून विक्रमसिंग राठोड (नाबाद २.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत गायकवाड (१२ गुण), कर्तव्य गाडेकर (२.१० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. पॉंडेचेरी कडून आर. विश्वनाथ (१ मि. संरक्षण), एम. दिबिनेश (१ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले. विजयाचा आत्मविश्वास, पुढील लढतींकडे लक्ष पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) संघांनी दाखवलेला आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ पाहता पुढील साखळी सामन्यांतही महाराष्ट्राकडून अशीच दमदार कामगिरी अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची खो-खो परंपरा अधिक बळकट होत असल्याचे हे सामने ठळकपणे अधोरेखित करतात.

कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत – सुनिल तटकरे

कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष… दादांनी दिलेला विचार घेऊन पक्ष पुढे नेऊ ही आमची भूमिका राहिल आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत – सुनिल तटकरे   कुणाला आमच्यावर…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात पारिवली जिल्हा परिषद शाळा अव्वल

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात पारिवली जिल्हा परिषद शाळा अव्वल कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या राज्यस्तरीय उपक्रमात जिल्हा परिषद…

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म…

एका दगडात किती पक्षी ? !

एका दगडात किती पक्षी ? ! महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची ख्याती यासाठी होती. ते जेंव्हा एखादी राजकीय हालचाल करायचे, धक्कादायक निर्णय घ्यायचे, तेंव्हा त्यांचे “लक्ष्य” काहीतरी निराळेच असायचे! दिसताना ते…

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे

बाल विवाह समस्येचे उच्चाटन व्हावे बाल विवाहावर कायदेशीर बंदी असतानाही आज बाल विवाह कमी होताना दिसत नाही. दररोजच्या वर्तमानपत्रात बाल विवाह झाल्याची एखादी तरी बातमी असतेच. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१…

सापांना रेल्वेत जागा…

सापांना रेल्वेत जागा… रेल्वेगाड्या आणि त्यामधून प्रवास करणारी माणसे बघितली आणि सापांचे (नव्हे प्रत्यक्ष नागोबांचे) चित्त खवळले. ‘हे काय मी जगातला सर्वात मोठा साप मानला जातो आणि मला कधीतरी कुणाच्या…