Month: February 2026

 कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जे प्रभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने स्थळावर जाऊन कारवाई केली. आणखी काही ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान संबंधितांना पुढील काळात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या व मंजूर नकाशा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नियमबाह्य बांधकामांवर प्रशासन कठोर कारवाई करेल.

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत हरिभाऊ लाखे नाशिक: शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व भुयारी गटारांच्या कामांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सध्या विविध भागांत रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच भुयारी मार्ग आणि गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. द्वारका, त्र्यंबक रोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड आदी प्रमुख भागांमध्ये एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. विशेषतः द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. सारडा सर्कल ते काठे गल्ली दरम्यान भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असले, तरी सध्या दोन ते तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी काठे गल्लीमार्गे मुंबई नाक्याकडे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे. या मार्गावर विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. ठिकठिकाणी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) देण्यात आले असले, तरी वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी टळत नाही. वाहतूक शाखेतर्फे अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे  चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी अरविंद जोशी मिरा -भाईंदर : जनतेच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना जनतेचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच त्याचे चित्रिकरण करण्यास मनाई करण्याचा अजब निर्णय मिरा भाईँदर महापालिकेने घेतल्याने गोंधळ उडाला.…

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली. लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ रद्द टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल न्युयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर लागू केलेले…

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द स्लग- पाच टक्के आरक्षण रद्द  शासन निर्णयाविरोधता मुंबई उच्च न्यायालयात याचिका मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढून शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी तसेच निमसरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना देण्यात येणारे ५ टक्के आरक्षण रद्द केले. २०१४ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड एजाझ नक्वी यांनी याचिका दाखल केली आहे. शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अचानक असं काय झाल की राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेल पाच टक्के आरक्षण रद्द केलं? असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत असल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले २३ डिसेंबर २०१४ रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्के झाले होते. काँग्रेस नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी  प्रभाकर शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता  २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.  स्थायी समितीच्या  सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली भिवंडीत भाजपा बंडखोराला काँग्रेसने महापौर केला स्वाती घोसाळकर भिवंडी : भारतात २०१४ नंतर राजकारणाचा पट बदलून टाकणाऱ्या भाजपाला भिवंडीत मात्र काँग्रेसने जोरदार झटका दिला. शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदेंना…

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आज पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ – १- अ अन्वये सभागृह नेता म्हणून  सागर ज्ञानेश्वर नाईक तसेच अधिनियमाच्या कलम १९ – १- अअ अन्वये विरोधी पक्ष नेता म्हणून  विजय लक्ष्मण चौगुले यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नव नियुक्त सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांचे महापौर श्रीम. सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले. नमुंमपा स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची निवड जाहीर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २०(२) सह वाचावयाच्या कलम ३१– अ (२) अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या १६ सदस्यांमध्ये  जयवंत सुतार,  सुधाकर सोनवणे,  शशिकांत भोईर,  अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज,  संदीप म्हात्रे,  प्रदीप गवस,  सुरेश शेट्टी,  सागर नाईक,  आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ,  सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या नवनियुक्त १६ सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.