Month: February 2026

लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा कोल्हापूर : एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असं वक्तव्य एकनाथ…

राष्ट्रवादीने विलिनीकराणाआधी भाजपाशी चर्चा करावी: फडणवीस

राष्ट्रवादीने विलिनीकराणाआधी भाजपाशी चर्चा करावी: फडणवीस मुंबई : अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा निर्णय करतील का? असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीने विलिनीकरणाचा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं आज स्पष्ट…

भाजपाच्या पियुष गोयलांनी केले प्रफुल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष !

भाजपाच्या पियुष गोयलांनी केले प्रफुल पटेलांना राष्ट्रीय अध्यक्ष ! मुंबई  : अजित पवारांच्या निधनामुळे अवघा महाराष्ट्र दुखात असतनाच आज भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचे सांगितले…

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार पाच संशयीतांना पुण्यातून अटक

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार पाच संशयीतांना पुण्यातून अटक मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून त्याच्या बालकनीच्या काचा मात्र या गोळीबाराने फुटल्या आहेत. बिष्णोई गँगने…

अल्काराजचा करियर ग्रँडस्लॅमचा विक्रम !

अल्काराजचा करियर ग्रँडस्लॅमचा विक्रम ! मेलबॉर्न : स्पेनचा युवा टेनिस स्टार कार्लोस अल्काराज याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ चे विजेतेपद जिंकत सर्वात कमी वयात करीयर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याचा नवा इतिहास रचला. अंतिम सामन्यात अल्काराजने अनुभवी नोवाक जोकोविच यांचा २-६, ६-२, ६-३, ६-४ असा…

भारताविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचवर पाकचा बहिष्कार

भारताविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचवर पाकचा बहिष्कार नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताविरूद्धच्या टी-२० वर्ल्ड कपमॅचवर बहिष्कार टाकला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये मॅच होणार होती. बांगलादेशने भारतात सुरक्षेच्या कारणावरून  खेळण्यास नकार दिल्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

आत्मनिर्भर भारतासाठीचा अर्थसंकल्प

आत्मनिर्भर भारतासाठीचा अर्थसंकल्प  महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी नवी दिल्ली: भारताला आत्मनिर्भर करणारा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत सादर केला. सलग नवव्यांदा बजेट मांडण्याचा विक्रमही निर्मला सीतारमण यांनी केलाय.…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

भरत, स्वरा, साराची विजयी सलामी

एमजेएससी ट्रॉफी कॅरम स्पर्धा भरत, स्वरा, साराची विजयी सलामी मुंबई : माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विविध जिल्ह्यातील शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भरत सावंत, आर.बी.शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, पाटकर हायस्कूल-डोंबिवलीची सारा देवन, पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे, व्ही.एन. सुळे गुरुजी हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर आदींनी सलामीचे सामने जिंकले. भरत सावंतने सुरुवातीपासून आघाडी घेत उशिरा सूर सापडलेल्या दिवीत छेडाचे आव्हान १०-८ असे संपुष्टात आणले. स्पर्धेचे शानदार उद्घाटन उद्योजक सुशील शेट्ये, क्लबचे पदाधिकारी विजय येवलेकर, सुनील पाटील, महेश शेट्ये, राजन गुप्ता, चंद्रकांत करंगुटकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील माहीम ज्यूवेनाइल स्पोर्ट्स क्लबमधील स्वरा मोहिरे विरुध्द देविका जोशी यांची लढत देखील अटीतटीमध्ये रंगली. डावाच्या मध्यापर्यंत दोलायमान झालेल्या चूरशीच्या सामन्यात स्वरा मोहिरेने ११-९ अशी बाजी मारली. अन्य सामन्यात सारा देवनने अनन्या पाध्येला १३-५ असे, दैविक जैनने अद्वैत महाडिकला २०-६ असे, प्रसन्न गोळेने ओमकार मोटेला २५-२ असे, तनया दळवीने वेदिका पोमेंडकरला १४-५ असे, उमैर पठाणने दक्ष संघवीला १३-३ असे तर ग्रीष्मा धामणकरने आरव आंजर्लेकरला २५-० असे पराभूत करून पहिली फेरी जिंकली. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील नामवंत ४२ शालेय खेळाडूंमध्ये एमजेएससी ट्रॉफीसाठी निकराच्या लढती सुरु आहेत.

`नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे – भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या नामांकित संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे `नृत्यविविधा’ हा विशेष नृत्य कार्यक्रम शनिवार, ७ फेब्रुवारी, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे. नृत्यालंकार मनाली मुकुंदराज देव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या संचालिका मनाली देव या प्रसिद्ध कथ्थक गुरू डॉ.  मंजिरी देव व सुप्रसिद्ध तबला वादक तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या शिष्या आहेत. या दोन्ही गुरूंचे मोलाचे मार्गदर्शन पण संस्थेला लाभत आहे. गुरु–शिष्य परंपरेच्या माध्यमातून कथ्थक नृत्यकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यास डॉ.  मंजिरी देव, पं. मुकुंदराज देव, प्रख्यात कथ्थक नर्तक पं. नंदकिशोर कपोते, खासदार नरेश म्हस्के, तसेच ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. या महोत्सवात संस्थेच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून कथ्थक नृत्याच्या विविध बंदिशी, भावप्रधान व कथानकात्मक सादरीकरणे, रंगतदार मराठी लोकनृत्ये तसेच “शक्तिरूपेण संस्थिता” या दिव्य स्त्रीशक्तीला अर्पण केलेल्या विशेष नृत्यनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २५ वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ काळाची गणना नसून, शिस्त, साधना आणि परंपरेत रुजलेली संस्कारमूल्ये जपणाऱ्या अनेक पिढ्यांच्या घडणुकीचा उत्सव असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या सांस्कृतिक महोत्सवाला कला रसिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच माध्यम प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.