५वी वरिष्ठ पुरुष व महिला गट फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-मध्य प्रदेश-२०२६

मुंबई :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने “५व्या वरिष्ठ गट कबड्डी” स्पर्धेकरिता आपले दोन्ही संघ जाहीर केले. संता, मध्य प्रदेश येथे  १९ ते २२ मार्च या कालावधित ही स्पर्धा खेळविण्यात येईल. नाशिकच्या आकाश शिंदे कडे पुरुष संघाचे, तर रत्नागिरीच्या सिमरन बुरोंडकर कडे महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या दोन्ही संघाना स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सोमवार १६ मार्च रोजी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. निवडण्यात आलेला हा संघ १७ मार्चला दुपारी ०१-३० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता रवाना झाला. अशी माहिती व संघाची घोषणा राज्य कबड्डी संघटनेचे सचिव माधव गायकवाड यांनी सर्व प्रसार माध्यमाकरिता केली. निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.

पुरुष संघ :- १) आकाश शिंदे-संघनायक, नाशिक, २)सुरज दूंदले – ठाणे, ३)आकाश अरसूल – मुं. उपनगर, ४) सौरभ राऊत – अ. नगर, ५) संकेत सावंत – मुंबई शहर, ६) सुरेश जाधव – पुणे, ७)साईप्रसाद पाटील – कोल्हापूर, ८)अजित चौहान – पुणे, ९) आदित्य शशिकांत शिंदे – रत्नागिरी, १०)आदित्य पोवार – कोल्हापूर, ११)अनुज गावडे – पुणे, १२)सौरभ फागरे – कोल्हापूर, १३) साहिल राणे – मुंबई शहर, १४) अभिषेक गुंगे – सांगली.

प्रशिक्षक :- निलेश शिंदे, मुंबई उपनगर                व्यवस्थापक :- भगीरथ पाटील, ठाणे.

महिला संघ :- १) समरीन बुरोंडकर, संघनायिका – रत्नागिरी, २) माधुरी गवंडी – ठाणे, ३) कोमल देवकर – मुंबई उपनगर, ४)तसनिम बुरोंडकर – रत्नागिरी, ५) शुभदा खोत – मुंबई उपनगर, ६) आम्रपाली गलांडे – पुणे, ७) प्रतिक्षा तांडेल – मुंबई शहर, ८) हर्षा शेट्टी – पुणे, ९) याशिका पुजारी – मुंबई उपनगर, १०) समृद्धी मोहिते – मुंबई उपनगर, ११) निकिता पडवळ – पुणे, १२) प्रणाली नागदेवता – मुंबई उपनगर, १३) संजना भोईर – पालघर, १४) साक्षी सावंत – मुंबई शहर.

प्रशिक्षिका :- मेघाली म्हसकर         व्यवस्थापिका :- अश्विनी ईश्वलकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *