मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात

गुढी पाडव्यानिमित्त भव्य बाईक रॅली तसेच गुढीची उभारणी

(राजेंद्र साळसकर)

मुंबई – हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्यामनगर तलाव येथे भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे. यावेळी परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  गुढी पाडव्याच्या दिवशी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्याम नगर तलाव येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य गुढीचे सकाळी १० वाजता खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पारंपारिक वेशभूषेत महिला, पुरुष तसेच तरुण सहभागी होणार असून लेझीमच्या तालावर तसेच ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्यांकडून नृत्यही सादर करण्यात येणार असून सर्वोत्तम वेशभूषा करून येणाऱ्यांंना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच अनेक स्पॉट बक्षिसेही देण्यात येणार आहे.

गुढी पूजनेनंतर भव्य बाईक रॅली काढण्यात येणार असून यात लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणार विविध विधानसभा क्षेत्रातील मिळून सुमारे १०० बाईकस्वार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. ही रॅली महाकाली गुंफा, बिंद्र कॉम्प्लेस, तक्षिला, मॉडेल टाऊन, पीएमजीपी म्हाडा सर्वोदय नगर, मेघवाडी पोलीस स्टेशन, स्वामी विवेकानंद स्कूल, मेघवाडी नाका, प्रेमनगर, समर्थ नगर, ठाकूर नगर, महाराज भुवन, धोबी घाट, जोगेश्वरी स्टेशन, सदभक्ती मंदिर, सुभाष नगर, बांद्रेकर  वाडी, जेव्हीएलआर, प्रतापनगर, रामवाडी, श्यामनगर पेट्रोल पंप, ओबेरॉय स्कूल, दुर्गानगर, मातोश्री कमाल अमरोही स्टुडिओ, एमएमआरडीए कॉलनी, पूनम नगर, नमस्कार, ग्रीनफिल्ड, कल्पतरू करून इच्छापूर्ती गणेश तलाव येथे या रॅलीची समाप्ती होणार आहे. सकाळी १०.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजातील एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्यात येणार असल्याचे, आयोजक मनीषा वायकर व दीप्ती वायकर पोतनीस यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *