थोरांदळे गावात विश्वासराव कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा

स्व. किसनरावांच्या दशक्रियेला केलेल्या घोषणेची अंमलबजावणी

मुंबई, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरांदळे गावच्या आदर्श कुटुंबातील  पिता कै. किसन शिवराम विश्वासराव यांच्या स्मरणार्थ  मुले सर्वश्री मारुती, रामहरी , नरहरी, डॉ. दत्ता, मुली कमल, सगुणा यांनी दशक्रिया विधीला जाहीर केलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन  देवदत्त निकम, भाजपाचे सानपाडा येथील नगरसेवक भाऊ भापकर, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रिती थोरात, पंचायत समिती सदस्या प्रियांका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. थोरांदळे गावातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात नेहमीच अग्रगण्य असणाऱ्या विश्वासराव कुटुंबियांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो,  या भावनेतून दशक्रिया विधीला जाहीर केलेले प्रवेशद्वाराचे काम साडेपाच महिन्याच्या आत पूर्ण करून त्याचा लोकार्पण सोहळा आयोजित केला. साडेपाच महिन्याच्या  निमित्ताने आळंदीचे ह. भ. प. श्री. गौतमनाना बेळगावकर महाराज यांची प्रवचन रुपी चांगली सेवा झाली. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गणेश यादव, डॉ.  घाडगे, डॉ. गोरडे, दत्ता हगवणे, शिवशंकर दूध डेअरीचे  चेअरमन आणि   थोरांदळे  गावातील  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब टेमगिरे,  लोकनियुक्त सरपंच जे. डी.  टेमगिरे, बाळासाहेब विश्वासराव, सोपान घुले, बाळासाहेब सोपान टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *