महापौर, उपमहापौर यांच्याकडून डॉ अग्रवाल हॉस्पिटलचा सन्मान
रमेश औताडे
मुंबई : डोळ्यांच्या हॉस्पिटल मध्ये आता मोतीबिंदू ऑपरेशनसाठी अत्याधुनिक रोबोटिक लेझर मशीन आले असून या नवीन तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन आता ब्लेड शिवाय अधिक सुरक्षित, अचूक आणि कमी त्रासदायक होणार आहे. या सुविधेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते डोळ्यांसाठी जगप्रसिद्ध असणारे डॉ.अग्रवाल हॉस्पीटल येथे झाले.
या मशीनच्या माध्यमातून विना ब्लेड शस्त्रक्रिया होणार असल्याने महापौर सुजाता पाटील यांनी हॉस्पिटलचे अभिनंदन केले. उपमहापौर दशरथ भगत यांनी गरीबांना सवलत देण्याची मागणी केली असता हॉस्पिटलच्या डॉ. वंदना जैन यांनी सवलत देण्याचे भगत यांना आश्वासन दिले. मर्यादित कालावधीसाठी मोतिबिंदू तपासणीवर ५० टक्के सूट आणि रोबोटिक शस्त्रक्रियेवर विशेष सवलत दिली जात आहे. हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू, नंबरचा चष्मा, रेटिना आणि मुलांच्या डोळ्यांचे आजार यावरही उपचार केले जातात. नवी मुंबईतच कमी त्रासात आणि सुरक्षित पद्धतीने डोळ्यांचे ऑपरेशन होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
