गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव

रमेश औताडे

मुंबई : धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्था बिघडत आहे. पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कर्करोग सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अशी माहिती मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेड च्या एका सर्वेक्षण अहवालात समोर आली आहे.

अनियमित शौच, ऑसिडिट, शौचावाटे रक्त येणं यासारख्या लक्षणावर लोक कशी प्रतिक्रिया देतान, तसेच डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब व त्यामुळे निदान करण्यास होणारा विलंब आणि जागरुकतेचा अभाव यामागील त्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला.

या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी, एस. एन. रहेजा हॉस्पिटल, मुंबई चेबीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोसे, मर एच. एन. रिलायन्स हॉस्पीटल, मुंबई येथीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *