जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी…
ठाणे पूर्वेकडील तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सव सोहळ्यात आज दशमीच्या दिवशी सहस्त्रचंडी होमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार सहभागी होऊन विधिवत पूजन केले. तसेच यानंतर देवीची आरती करून तिचे आर्शिवाद घेतले. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, प्रकाश कोटवानी, विलास जोशी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
