‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…!

‘चिमणी पाखरं ‘सोबत धरला ताल!

कुडाळ:‘सिंधु सरस’ प्रदर्शनातील चिमणी पाखरं डान्स   अकादमीच्या एका आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे ‘सिंधुसरस’ प्रदर्शनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या कार्यक्रमाला नुसतीच उपस्थिती दर्शविली नाही तर चक्क व्यासपीठावर येऊन नृत्याचा आनंद लुटला. अकादमीच्या  कलाकारांसोबत त्यांनी केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित रसिक  प्रेक्षकांनी टाळयांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ‘चिमणी पाखरं अकादमीच्या मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला.मात्र यावेळी उपस्थित असलेल्या ‘मॅडम’ ना मोह आवरला नाही. त्या उठल्या आणि तडक व्यासपीठावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि सर्वांनाच आपल्या नृत्यविष्काराने अचंबित केले. जिल्हाधिकारी धोडमिसे या एक  उत्तम प्रशासक  आहेतच पण त्याचबरोबर ‘भरतनाट्यम’ या शास्त्रीय नृत्य प्रकारात त्या पारंगत आहेत. या आधीही त्यांच्यातील कलाकार हा अनेक कार्यक्रमांमधून समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *