धक्कादायक ! दोन पोलिसांनी किडनॅप करून केली लुटमार

मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळिमा

संदीप शिंदे आणि गजेंद्र राजपूत या दोन्ही पोलिसांना अटक

दहा हजार डॉलर लुटण्यासाठी केले किडनॅपिंग

सिद्धेश शिगवण

मुंबई : “सदरक्षणाय, खलनिग्रहणाय” हे ब्रिदवाक्य घेऊन मुंबईतील सज्जनांचे रक्षण करण्याची आणि दुष्टांचा नाश/दमन करण्याची शपथ घेणाऱ्या मुंबई पोलिसदलातील दोन पोलिसांनी आज मुंबई पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासला. मुंबईच्या जुहू परिसरात दोन पोलिसांनी एका व्यक्तीला किडनॅप करुन क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचं सांगून लुटल्याची घटना घडली आहे. दहा हजार डॉलर लुटण्यासाठी त्यांनी हे किडनॅपिंग केल्याचे उघडकीस आले आहे. जुहू पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन पोलिसांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्याकडून करन्सी एक्सचेंज करणारी फोरेक्स कंपनीच्या कामगाराला किडनॅप करून लुटण्याचे धक्कादायक घटना घडली आहे. फोरेक्स कंपनीचा ऑफिसमध्ये काम करणारा कामगार सुमित आंबेकर विलेपार्ले परिसरात १० हजार अमेरिकन डॉलरची डिलिव्हरी करण्यासाठी जात असताना एका इमारतीमध्ये या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून मारहाण करून एका कारमध्ये बसवून किडनॅप केले.

यानंतर या दोन्ही पोलीस शिपायांनी किडनॅप करून त्या व्यक्तीला मी पोलीस आहे आणि पोलिसांच्या ओळखपत्र दाखवून दहिसर पूर्वेत हनुमान मंदिर शेजारी घेऊन गेले, त्या ठिकाणी त्याला मारहाण करून तुझा व्यवसाय चुकीचा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात चीटिंग केली जात आहे. त्यामुळं तुमच्या कंपनीच्या सर्व पेपर घेऊन दहिसर क्राइम ब्रांच ऑफिसमध्ये बोलवा, यानंतर फिर्यादीने म्हटलं ठीक आहे. पोलीस स्टेशनला घेऊन चला मी सर्व पेपर मागवतो यानंतर थेट या पोलिसांनी मारहाण करायला सुरुवात केली.

रस्त्यावर पोलिसांनी फिर्यादीला मारहाण करत असताना लोकांनी पाहिला यानंतर त्या ठिकाणी जमा झालेला जमावाने दोन्ही पोलिसांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर लोकांनी पोलीस कंट्रोल नंबर वर कॉल करून पोलीस स्टेशन मधून मदत मागवली. दहिसर पोलिसांनी यानंतर या दोन्ही पोलिसांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यासाठी जुहू पोलिसांकडे पोहोचवले. जुहू पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला पोलीस आरोपी संदीप शिंदे बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. तर गजेंद्र राजपूत हा पोलीस शिपाई जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *