येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक

उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आढावा

अशोक गायकवाड

रायगड-कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे कृषी संशोधन केंद्रात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. यावेळी विविध पूर्वतयारी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्र अधिकारी ऐप द्वारे मॅपिंग पूर्ण करणे तसेच प्रोजेनी मॅपिंग तत्काळ पूर्ण कराव्या, ८५ वर्षांवरील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरून घेणे, मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यास जबाब, पंचनामा व कुटुंबीयांची स्वाक्षरी घेऊन कार्यवाही करणे, अस्पष्ट / ब्लॅक अँड व्हाईट फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेऊन फॉर्म क्रमांक ८ भरून घेणे, मॅपिंग कार्यवाहीबाबत मॅपिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्याचे निर्देश टेबल टॉप एक्टिविटी द्वारे २००२ व २०२४ मतदार याद्यांचे जुळवणी (मॅपिंग) करणे, जुळवणी न झाल्यास प्रोजनी मॅपिंग(आई-वडील/आजी-आजोबा यांच्या आधारे) करणे, उर्वरित अद्याप सर्वेक्षण झालेले नाही अशा मतदारांसाठी घरभेट देऊन माहिती संकलन करणे, मॅपिंगनंतरची माहिती बूथ लेवल अधिकारी ऍप वर ऑनलाइन अपलोड करणे, राज्यातील ऑनलाइन मॅपिंग फक्त २१% पूर्ण असल्याने गती वाढविण्याचे निर्देश (मोजणी/ गणना फॉर्म) छपाई डेटा उपलब्ध झाल्यानंतर २ दिवसांत डाउनलोड व ३ दिवसांत छपाई पूर्ण करणे, छपाईसाठी जिल्हास्तरावर अभिकर्ता नियुक्ती तातडीने करणे, टप्प्याटप्प्याने (उदा. २०० फॉर्म) छपाई करून वितरण करणे, इंटरनेट वेग लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डाउनलोड करण्याचे नियोजन, DSE पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील DSE Generation नंतर पडताळणी व वगळणी तातडीने पूर्ण करणे मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक बाबत प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करणे, मतदान केंद्र अधिकारी अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, BLO Call Book सुविधा वापरून नागरिकांच्या कॉलला त्वरित प्रतिसाद देणे, प्रशासकीय व्यवस्था कामाचा ताण कमी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याची तयारी करणे , मतदान केंद्र अधिकारी पर्यवेक्षक मार्फत फॉर्म संकलन व नोंद प्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनकरणे, विशेष सूचना अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी तातडीने पूर्ण करणे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शुद्ध, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *