रहिवासी जागेत शेड, गोदाम उभारू देणार नाही- नरेंद्र मेहता

मिरा – भाईंदर : मिरारोड (पुर्व) परिसरातील प्लेझंट पार्क या भागात मंगळवारी सांयकाळी ८.३० च्या सुमारास मंडप डेकोरेटर्सचे साहित्य असलेल्या मोकळ्या भुखंडावर मंडप शेडला भीषण आग लागल्याची घटना घडली, मिरा भाईंदर अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र आजुबाजुला असलेल्या इमारतीमध्ये राहणा-या रहिवाश्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली.

सुदैवाने कोणतीही जिवितहानी यामध्ये झाली नसली तरी यामध्ये नागरिकांच्या घरातील साहित्यांचे व सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करुन संबधित नागरिकांच्या झालेल्या वित्तहानी बाबत योग्य उपाययोजना करुन निर्णय घ्यावा अशा सुचना आमदार नरेंद्र मेहता यांनी केल्या. घटनास्थळी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सोबत प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले, अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.अनिता पाटील,नगरसेवक मोहन म्हात्रे, मनस्वी पाटील, सुरेखा सोनार,मनीष पराशर उपस्थित होते.मोकळ्या जागेत उभारलेली गॅरेज, गोडाऊन, फर्निचर दुकाने, झोपड्या इ. तात्काळ हटवणे व ज्वलनशील साहित्य साठवणाऱ्या अनधिकृत ठिकाणांवर कडक कारवाईचे करण्याचे निर्देश दिले आहे. मिरा भाईंदर शहरात यानंतर नागरी वस्तीत एकही गोदाम, शेड उभारू दिले जाणार नाही असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *