श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर
कल्याण : कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते. कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजू या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.
गुरूवार झालेल्या अन्नधान्य वितरण व आरोग्य तपासणी शिबिर या उपक्राला विशेष अतिथी म्हणून कल्याण पोलीस परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, नगरसेवक प्रतिक पेणकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक जसू चंदाराणा व तुषार दाणी यांनी संस्थे तर्फे त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित विमल ठक्कर, केशु लिमानी, डॉक्टर अवधूत शेट्ये, मोनीस चंदाराणा, सुभाष रायचुरा, विष्णूकुमार चौधरी, राजीव चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले.
यावेळी नगर सेवक प्रतिक पेणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या संस्थेचे चांगले कार्य असून आपल्या सेवा कार्य मघ्ये सहभागी होवू अशी खात्री दिली आणी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक करुन कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व त्या कामात सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
