सहकारातून गृहनिर्माणाला नवी दिशा – फडणवीस

मुंबई, दि. — महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण क्षेत्राला नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे आज मुंबईत उत्साहात पार पडले. कन्नमवार नगर, विक्रोळी येथे मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, तर सायनमधील प्रतीक्षा नगर येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘सहकार भवन’चे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमातून सहकारी गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र हा देशातील सहकार चळवळीचा पाळणा मानला जात असून, गृहनिर्माण संस्था या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा घटक आहेत. शहरी विकास आणि समुदाय जीवनशैलीत या संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीत मोलाची भूमिका बजावली असल्याचे नमूद करण्यात आले. सहकार संस्थांच्या बळावर समावेशक विकास साधता येतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अॅड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *