सम्राट अशोक जयंतीनिमित्त BRSPचा संवाद वितरण सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात
उल्हासनगरमध्ये बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा उपक्रम
उल्हासनगर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) उल्हासनगर युनिटच्या वतीने २६ मार्च रोजी देवानं प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘BRSP संवाद वितरण सोहळा’ व कार्यकर्ता सम्मेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकज चाळके (युवाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश), सतीश बनसोडे (वरिष्ठ नेते, BRSP ठाणे), भिकाजी खैरनार (कार्यकर्ता, BRSP), रतन मोरे (ठाणे जिल्हाध्यक्ष, दि बुद्धिस्ट रिसर्च सेंटर) व सुरेश केदार (अध्यक्ष, उल्हासनगर – दि बुद्धिस्ट रिसर्च सेंटर) उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकटीकरण, सामाजिक बांधिलकी आणि विचारप्रसार याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान ॲड. प्रदीप खंकाल यांनी BRSP पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच कला साहित्य अकादमीचे कार्यकर्ता निलेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजू भालेराव, ॲड. राजेश कोळी (वकिल आघाडी, BRSP उल्हासनगर) आणि प्रताप खैरे यांनी केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली. यामध्ये विनोद सोनवणे (महासचिव, दि बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, उल्हासनगर), भालचंद जैस्वाल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल हिंदी विद्यालय), हरिश्चंद्र यादव (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी विद्यालय), आधार निकम, मयूर निकम, ॲड. श्रीनिवास दासरी, ॲड. मंदा सोनवणे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भिकाजी खैरनार यांनी केले.
एकूणच सम्राट अशोक महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम विचारप्रसार व संघटन दृढ करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरला.
