स्केटिंगपटू सिवाह नवलेंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

तैवानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

मुंबई :विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील युवा स्केटिंगपटू सिवाह संतोष नवलें हिने आर्टिस्टिक रोलर स्केटिंगमध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची तैवान येथे होणाऱ्या ओपन इंटरनॅशनल आर्टिस्टिक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा १३ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडणार आहे.

सिवाहने विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात प्रशिक्षक आदेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे प्रशिक्षण घेतले. तिच्या लयबद्ध आणि आकर्षक सादरीकरणासोबतच भक्कम तांत्रिक कौशल्यामुळे ती विशेष ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे हा तिच्यासाठी आणि तिच्या प्रशिक्षक, कुटुंबीय तसेच समर्थकांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा ठसा उमटवत देशासाठी नावलौकिक मिळवण्याचा सिवाहचा निर्धार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *