श्रेयांश, पलाशचा विजयी फॉर्म कायम
मुंबई, ३० मार्च: श्रेयांश सोमैयाने (३ गुण) सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने पुन्हा एकदा काळ्या सोंगट्यांनी खेळताना अथर्व पोलेकरवर (२ गुण) मात दिली.
पाचव्या बोर्डवर, पलाश मापाराने (३ गुण) काळ्या सोंगट्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (२ गुण) पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
एएफएम सोहम पवारने (३ गुण) देखील अनिश एस कश्यपचा (२ गुण) पराभव करत तिसरा गुण मिळवला.
निकाल – दुसरी फेरी (टॉप-10): अथर्व पोळेकर (2) पराभूत वि. श्रेयांश सोमय्या(3) – 0-1;तनुज, दयाल (2.5) बरोबरी वि. एआयएम आकाशकुमार यादव (2.5) – 0.5-0.5; दीपक सोनी (2) पराभूत वि. आश्वी अंकित अग्रवाल (3)- 0-1; एएफएम सोहम पवार (3) विजयी वि. अनिश एस कश्यप (2) – 1-0; प्रेयस वाघमारे (2) पराभूत वि. पलाश मापारा (3)- 0-1; तिस्या अपूर्वा पट्ट (2) पराभूत वि. प्रतीक यादनिक (3)- 0-1; ईशान जथान (2) पराभूत वि. एजीएम राजवीर नहार (3)– 0-1; मेहुल तांडेल (२) पराभूत वि. अनिरुद्ध आनंद अय्यर(३) – ०-१; अहान कातरुका (3) विजयी वि. अभिजय बरुआ (2) – 1-0; पंकज बोरसे (2.5) बरोबरी एएफएम ओंकार विश्वास गायकवाड (2.5) – 0.5-0.5.
00000000
