मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संलग्न आम्ही सातारकर उद्योजक संघाचा भव्य व्यावसायिक मेळआवा ४ एप्रिलला होणार आहे. हा मेळावा मनोहर जोशी हायस्कूल, निसर्ग उद्यानासमोर, धारावी, मुंबई येथे सकाळी १० ते २ या वेळेत होईल. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, व्यवसायिक माहिती – ट्रेनिंग , नवीन वेबसाईटचे प्रकाशन – नाव नोंदणी – भव्य उद्योजक मेळाव्याचे मार्गदर्शन, मराठा उद्योजक सारथी – नवयुवंकांसाठी सरकारी नवीन योजना – व्यवसायाची संपूर्ण माहिती- अर्थसाह्याची विविध मार्ग अशा प्रकारचा हा मेळावा असेल. यासाठी कुठलेही शुल्क नाही. तसेच या कार्यक्रमांमध्ये- अनेक उद्योजकांचे सत्कार केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क श्रीधर फडतरे ८००७७७९०९५.
