जव्हार येथे उत्साहात “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन

योगेश चांदेकर

पालघर- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३२ व्या मन की बात कार्यक्रमाचे आज जव्हार येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  माधवी  नाईक, जिल्हाअध्यक्ष भरत राजपूत, पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजपचे ज्येष्ठ नेते  बाबाजी काठोले, विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संवादातून देशाच्या प्रगतीचा वेग, सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा आणि राष्ट्रनिर्मितीची नवी दिशा यांचा सखोल आढावा घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेसारखेच, या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *