तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम
मुंबई: महाराष्ट्र राज्यात तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश अधिक आधुनिक आणि डिजिटल होत असताना, “एमएमआरडीए” देखील आता अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकांसाठी सोयीस्कर अशी प्रशासन व्यवस्था उभारण्यावर भर देत आहे. यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद होत व्यक्त होत आहे. तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत ‘एमएमआरडी’एने राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. संजय मुखर्जी महानगर (आयुक्त) एमएमआरडीए यांनाही प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे.
‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम पुरस्कारासाठी सहभागी शासकीय संस्थांचे मूल्यमापन कर्मचारी विकास आणि सेवा नियमांच्या पालनाशी संबंधित ९ निकषांवर करण्यात आले. तसेच, ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्रशासनाचा वापर करण्यासंदर्भातील ७ विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले.
हे यश डॉ. संजय मुखर्जी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि टीम “एमएमआरडीए”च्या प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे, ज्यांची वचनबद्धता, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेवरील विश्वास या प्रदेशाच्या परिवर्तनाला दररोज नवी ऊर्जा देत आहे.
