तरुणाई एकाकी होत्येय…
कुटुंबातला संवाद कमी होत असल्याचे पूर्वी केवळ जाणवत असे. फार पूर्वी तर त्याला घरातील आणि समाजातील वयस्कर व्यक्तींच्या बाबतीतील आदर मानले जायचे. संवाद कमी होण्याचे कारण विचारांमधील तफावत म्हानाल तर तसे काही दिसत नाही मग तरुणांनी एकाएकी ‘जेन झेड’ चीई कास धरली असेल असे वाटत नाही. मग सध्याचे युद्ध सुरु होण्याचा अगोइदर एका अति प्रगत देशातील ६५ हजार तरुण मुलामुलींच्या अभ्यासात असे दिसले की या तरुणाईमध्ये एकाकीपणा प्रचंड वाढला आहे आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणाईने ही गोष्ट काहीशा धीटपणे काबुल केली आहे.
उत्साहाने परिपूर्ण असावे अशा या वयात तरुणाईच्या एकाकीपणाचा संबंध समाज माध्यमांच्या अविरत उपयोगाशी लावला जात असून खऱ्या जगातील त्यांचा संवाद समाज माध्यमांनाच संरक्षण देत असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयीन आरोग्याच्या विषयावरील एका संशोधन नियतकालिकात ही माहिती दिली गेली आहे. आठवड्यातून किमान १६ तास म्हणजे दिवसाला किमान दोन तास समाज माध्यमांवर घालवण्यामुळेच असे घडत असावे असा निष्कर्ष निघत असल्यामुळे महाविद्यालयांनी या बाबतीत समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे असे म्हटले गेले आहे.
मानव संसाधान क्षेत्रात संशोधन करीत असलेल्या डॉ. मॅडेलीन हिल म्हणतात की एकाकीपणा वाढला तर व्यक्ती नैराश्याकडे अधिकाधिक झुकू लागते आणि अशा व्यक्तींना दीर्घायुष्य लाभत नाही अशीही उदाहरणे आहेत. प्रौढत्वाकडे जात असताना मानसिक आरोग्याची जोखीम असते हेही एक मान्य असे तत्व आहे. या वयात घरापासून दूर एकटे रहावे लागणे तसेच नवे मैत्र तयार होणे या घटना होणारच त्यांचाही बरा-वाईट परिणामही शक्य असतोच. समाज माध्यमांच्या अधिक उपयोगामुळे समाजातील इतरांशी प्रत्यक्षपणे संवाद होऊ शकत नाही. त्यामधूनही एकाकीपणा निर्माण होऊ शकतो.
‘मला वेगळेच ठेवले गेले. कुणाशी मैत्रीही झाली नाही आणि माझा एकाकीपणा वाढू लागला,,’असे एक तरुण विद्यार्थी म्हणाला. यावर वेळीच उपाय शोधायला हवा होता. संमिश्र अभ्यासक्रमात असलेल्या तरुणाईला दिवसभरात वेगवेगळ्या व्यक्ती भेटत राहिल्यामुळे एकाकीपणाची झळ कमी लागते. जेथे तरुणाईला अभ्यासाव्यतिरिक्त रजेच्या दिवशी शहरातच आप्तेष्टांन भेटण्याची संधी असते त्यांच्या बाबतीत एकाकीपणा किमान असतो. मात्र महाविद्यालयीन काळात स्वत:च्या घरी असलेल्या तरुणाईमध्ये होस्टेलशी तुलना करता एकाकीपणा अधिक असतो अशी आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट समोर आली.
दर आठवड्याला १६ तास एकाकीची सूचना असते. वाढत्या तासानुसार हे प्रमाण वाढते. इतरांशी संबंध आणि एकाकीपणा याचा अभ्यास करताना असेही दिसले की समाज माध्यमे वैयक्तिक संबंध प्रस्थापित करीत असताना कुटुंबात तसे होईलच अशी खात्री देता येत नाही. ‘चिरंजीव दिसले नाहीत जेवायला’ आणि ‘तुझा मित्र खूप आवडला..बोलका आहे…’ या दोन वाक्यातील फरक सहज लक्षात येईल. डॉ. अॅशले मेरियानोस या तज्ञाचे या संबंधातील ‘सामाजिक संबध सुधारणे हा या ‘साथी’ वरील एक उत्तम उपाय आहे’ हे भाष्यही महत्वाचे आहे. तेवढा अमलात आणता आला तर..
काहीतरी नवीन…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
