दीपक केसरकरांची

भोंदू खरातवर कृपा

शालार्थ आयडी घोटाळ्यात

हरिभाऊ लाखे

नाशिक : दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरातवर केसरकर कृपा’ झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचा सहभाग असल्याचा संशय आता वर्तवण्यात येत आहे.

२०२२ साली तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची चर्चा आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातची चौकशी होण्याची शक्यता आहे. दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की खोटा, याचा तपास पोलीस करणार आहेत.

अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा, याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.

निलम गोऱ्हेंचेही खरातला भेटल्या होत्या ?

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी माजी उपसभापति नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले आहेत. आमदार निलम गोऱ्हे मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यलयात जात होत्या. नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्षे खरातकडे जात होत्या असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी त्यांची बाजू मांडली. अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मी ज्यांच्यावर टीका केली ते दुखावले असतील, त्यामुळेच हे आरोप होत असल्याचं सांगत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *