भारतातील प्रत्येक तिसरा नागरिक प्रभावित

मिरा -भाईंदर
जागतिक यकृत दिन २०२६ निमित्त मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सने मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) — ज्याला पूर्वी NAFLD/NASH म्हणून ओळखले जात होते — या आजाराच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “सुदृढ सवयी, निरोगी यकृत” या थीमअंतर्गत समोर आले आहे की भारतातील सुमारे ३० % लोकसंख्या फॅटी लिव्हरच्या समस्येने प्रभावित असू शकते. हा एक सामान्य पण सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे न दिसणारा आजार असल्याने अनेकदा तो दुर्लक्षित राहतो. MASLD चा थेट संबंध आजच्या बदलत्या जीवनशैलीशी आहे. असंतुलित आहार, लठ्ठपणा, मधुमेह आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे यामागील प्रमुख घटक आहेत. सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे दिसत नसल्यामुळे आजार ओळखणे कठीण जाते. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा आजार सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर अवस्थांमध्ये रूपांतरित होऊ शकतो.
मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे  डॉ. इमरान शेख, कन्सल्टंट जीआय, एचपीबी आणि जीआय ऑन्कोसर्जन म्हणाले, “मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज म्हणजेच मेटाबॉलिक बिघाडाशी संबंधित फॅटी लिव्हर हा एक ‘सायलेंट’ पण झपाट्याने वाढणारा धोका आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे हा आजार आता तरुण वयोगटातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सुमारे 9०% लिव्हरचे आजार वेळेवर जीवनशैलीत बदल करून टाळता येऊ शकतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी केल्यास हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात नियंत्रणात आणता येतो किंवा उलटवता देखील येतो.”
डॉ. इमरान शेख, पुढे म्हणाले आजकाल तरुणांमध्ये लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दीर्घकाळ बसून राहणे, जंक फूड आणि साखरयुक्त पेयांचे अतिसेवन, तसेच शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत. २० ते 3० वयोगटातील तरुणांमध्येही आता फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढताना दिसत आहे, जो वयोगट पूर्वी कमी धोक्याचा मानला जात होता. यासोबतच वाढता मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोम हा धोका अधिक गंभीर करत आहे. मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सने विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना नियमित लिव्हर तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. कारण लिव्हरचे आजार सुरुवातीला लक्षणविरहित असतात आणि अनेकदा उशिरा निदान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *