मुंबई / रमेश औताडे

“मेंदूचा विकास अपुरा असणे या ‘ऑटिझम’ आजाराची सुरुवात गर्भाशयातूनच होते. ऑटिझम आजार तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या मुलाच्या आयुष्याला विकलांग करण्यापूर्वीच त्याला ओळखा व ऑटिझमचे निर्मूलन करा”, अशी माहिती ‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’ चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन, शिवसेना मेडिकल हेल्प सेल , माझा ‘सु’ संकल्प अभियान आणि करुणा सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटिझमग्रस्त रुग्णांसाठी मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचे आयोजन येत्या २६ एप्रिल, रोजी म्हैसूर ऑडिटोरियम, किंग्स सर्कल समोर, माटुंगा ईस्ट येथे करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना मेडिकल हेल्प सेल चे प्रमुख मंगेश चिवटे व इतर डॉक्टर पालक उपचार मुक्त रुग्ण पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *