अशोक गायकवाड
रायगड- कर्जत : उद्योग संचालनालय, मार्फत विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची १७ ते १९ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय राज्य स्तरीय परिषद युनिव्हर्सल एआय युनिर्व्हसिटी, कुशिवली,कर्जत जि. रायगड येथे संपन्न झाली. यावेळी विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची राज्य स्तरीय परिषद-२०२६ करीता राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह,(भाप्रसे), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्येाग) वैभव वाघमारे(भाप्रसे), अतिरिक्त उद्योग संचालक, बाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग विभागाचे सर्व विभागीय उद्योग सह संचालक, सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया उपस्थित होते. उद्येाग संचालनालयाद्वारे राज्यात उद्योग व स्वंयम रोजगाराकरिता अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विकासात्मक योजनासाठी व राज्याच्या एकूण औद्योगिक विकासासाठी राज्याचे उद्योग,गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ जाहीर झालेले आहे. या परिषदेत राज्याचे औद्योगिक गुंतवणूक, सेवा उद्योग धोरण-२०२५, माहिती तंत्रज्ञान धोरण, व्यवसाय सुलभता,मैत्री इ. विषयांवर सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातील सर्व अधिका-याकरीता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) चा प्रशासकीय कामात वापर यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्येाग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे संदिप पाटील यांनी राज्यस्तरीय परिषदेस उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
