मुकुंद रांजाणे (माथेरान)

माथेरान नगरपरिषदे च्या शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समितीची सभा सोमवारी नगरपालिकेच्या स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून  बुधवार दि २२ रोजी अंगणवाडी व माथेरान मधील तिन्ही शाळांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् प्राजक्ता गांगल या मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल. या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरुणांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी यासाठी प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मध्ये टेबल टेनिस, दोन कॅरम बोर्ड, बॅडमिंटन व बुद्धिबळ याचा समावेश असेल.  तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या पत्र्यांना रंग लावणे कामाला देखील मंजुरी देण्यात आली. शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने व सुरेखा साळूंखे यांच्या सह नगरपरिषदेचे समीर दळवी यांनी सभेचे कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *