एम सी एफ कॅरम स्पर्धा
मुंबई:महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने २३ ते २५ मे दरम्यान ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा बोरिवली, पश्चिम येथील मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या वातानुकूलित हॉलमध्ये संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मिळून पुरुष एकेरी गटात ३०२ तर महिला एकेरी गटात ५६ खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी गटात असे दोन्हीकडे ठाण्याच्या झैद अहमद फारुकी व समृद्धी घाडिगावकरने प्रथम मानांकन प्राप्त केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. पुरुष एकेरी गटाचे सामने २३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खेळविण्यात येतील. तर महिला एकेरी गटाचे सामने २४ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सुरुवीच्या काही महत्वाच्या व उप उपांत्य फेरी पासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे.
पुरुष एकेरी मानांकन
१) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), २) अभिजित त्रिपनकर ( पुणे ), ३) संदीप दिवे ( जळगाव ), ४) सौरभ मते ( मुंबई ), ५) प्रशांत मोरे ( मुंबई ), ६) रहीम खान ( पुणे ), ७) सागर वाघमारे ( पुणे ), ८) महम्मद घुफ्रान ( मुंबई )
महिला एकेरी मानांकन
१) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), २) श्रुती सोनावणे ( पालघर ), ३) निलम घोडके ( मुंबई ), ४) ऐशा साजिद खान ( मुंबई ), ५) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई ), ६) रिंकी कुमारी ( मुंबई ), ७) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ), ८) चैताली सुवारे ( ठाणे )
