कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ दिनांक २८ मे ते ३१ मे २0२६ रोजी मडगाव गोवा येथे होणाऱ्या १६व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धेकरता दिनांक २६ मे व २७ मे रोजी उल्हासनगर महानगरपालिका चॉकबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशनच्या अंतर्गत राज्यस्तरीय सराव शिबिराचे आयोजन एसएचएम महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या गणवेश वाटपाच्या निमित्ताने समाजसेवक हसन शेख, महाराष्ट्र राज्य प्रभारी सचिव जयवंत बोभाटे, खजिनदार राहुल अकुल व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच हे सराव शिबिर घेण्याकरिता एसएचएम महाविद्यालयाच्या किरण चिमनानी, ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशन सचिव संदीप नरवाडे, उल्हासनगर महानगरपालिका चॉकबॉल असोसिएशन सचिव निलेश आरेकर, ठाणे जिल्हा चॉकबॉल असोसिएशन सहसचिव विक्रम काळे यांनी अथक मेहनत घेतली.
000000
