इंधनदरवाढ आणि वाढत्या महागाईचा केला निषेध
कल्याण : इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणात काँग्रेसचे अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसरात काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनदरवाढ आणि त्यामुळे होत असलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशन परिसरात निषेध आंदोलन करत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान याच घोड्यावर बसून कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालय गाठत, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
