००००००००
००००००००
परळ: फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागाचे सुरेश ईश्वर पोटे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्र, परळ येथे एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिराचा लाभ ७० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीपणे पार पडला. शिबिरासाठी योगेश तोडकर व मनोहर शिंदे यांनी मोलाचे योगदान व मार्गदर्शन केले. स्वामी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात एनसीएमसी नोंदणी शिबिर आयोजित केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सुरेश पोटे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
हा उपक्रम राबवण्यासाठी स्वामी संस्थेच्या उपाध्यक्ष वैशाली विष्णु शिंदे, कार्याध्यक्ष मोहन कटारे, उपसचिव प्रतिभा सपकाळे, खजिनदार उल्हास हरमळकर तसेच प्रमुख विश्वस्त प्रतिभा सावंत, विमल माळोदे, गीता नाडकर्णी, नीलम सावंत आणि शिवाजी गावकर यांनी विशेष सहकार्य केले. एनसीएमसी कार्डमुळे ज्येष्ठांना एस टी बसेस, बेस्ट, मेट्रो व रेल्वे प्रवासासाठी एकच कार्ड वापरता येणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
