मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय टपाल खात्याच्या बोरीवली पूर्व येथील कार्यालयात सुमारे ३५ वर्षे सेवा बजावणारे खेळिराम अवकीरकर आणि तीस वर्षे सेवा केलेले प्रसाद मुंगेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. या दोघांचाही अनुक्रमे पोस्ट मास्तर श्वेता सोनावणे आणि सहाय्यक पोस्ट मास्तर शिवाजी चौगुले यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. या दोन्ही मान्यवरांनी खेळिराम अवकीरकर आणि प्रसाद मुंगेकर यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी सुनील पांगे, सुयोग हुले, संजय पोटे, शांताराम जंगली, वसंत घडशी, भानुदास निकम तसेच अवकीरकर आणि मुंगेकर कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *