मु़ंबई- अरिहंताणं रक्त सारथी संस्थान,राजस्थान आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान-२०२६ या सोहळ्यात जीवनदान ग्रुपचे संस्थापक राजेंद्र साळसकर यांना श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान -२०२६ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रक्तदान चळवळ, सामाजिक सेवा आणि मानवतेच्या कार्यात उल्लेखणीय योगदान देणा-या अनेक दिग्गज  समाजसेवकांचा यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात आला. जीवनदान ग्रुपचे संस्थापक तसेच पत्रकार राजेंद्र साळसकर, युनिक ब्लड मोटिव्हेटर्सचे जय साटेलकर व अमोल सावंत,कुंडलिक आव्हाड,मुंबई पोलिस  क्राईम ब्रांचचे रामेश्वर खरूळे,विनोद साडविलकर,सागर नाईक,संजय गांगुर्डे आदिंना उल्लेखणीय सामाजिक कार्याबद्दल सन्मान प्रदान  करण्यात आला.
राजेंद्र साळसकर यांनी जीवनदान ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिरे आयोजित करून असंख्य कोवीड रूग्णांना रक्त,प्लाझ्मा व प्लेटलेटचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष सहकार्य केले.तसेच गरजू रूग्णांना रक्तदान, प्लेटलेट व प्लाझ्माचा पुरवठा होण्यासाठी साळसकर यांच्या जीवनदान ग्रुपचे सहकारी २४ तास प्रयत्नशील असतात.  तसेच बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या  वतीने गरिब व होतकरू २२ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेद्वारे दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्यांना शिक्षण घेण्यासाठी सहकार्य केले जाते.तसेच गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे या मागणीसाठी,गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या सर्व नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी लढा दिला.राजे़द्र साळसकर यांच्या या कार्याची दखल घेत मालाड येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहोळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल मोटिव्हेटर्स असोसिएशन चे संस्थापक तसेच ब्लडीफास्ट मोबाईल अॅपचे निर्माते अजित वहाडणे,कारगील युद्धातील शौर्यगाथेचे मानकरी कॅप्टन डॉ.सुरेशकुमार सैनी सावंतवाडीचे रूग्ण कल्याण समितीचे सदस्य तसेच नगरसेवक देव्या सुर्याजी, घाटकोपर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक नालंदा लांडगे,कुरार पोलिस पोलिस उपनिरिक्षक सुनिल गावडे,तसेच युनिक ब्लड मोटिव्हेटर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जय साटेलकर आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी युनिक ब्लड मोटिव्हेटर्सचे जय साटेलकर, सिद्धेश साटेलकर,मंगेश ठाकूर, किरण पार्सेकर, विजय माणगावकर,किशोर माधव,विराज गावडे, निनाद ठकरूल,अमित गावडे,अमेय गिरकर, किरण गिरकर,कृष्णा कदम,मनोज सुर्वे,सागर कांदळकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *