००००००००
नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्ग निवडण्यासाठी  मार्गदर्शक असे “शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर” शनिवार, ११ जुलै रोजी ऐरोली येथील शिवसमर्थ सहकारी पतपेढी लि. यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात दहावी व बारावीनंतर कोणता मार्ग निवडावा, आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात, ॲप्टिट्यूड (Aptitude) टेस्ट म्हणजे काय, शिक्षणाचे विविध पर्याय कोणते आहेत तसेच योग्य करिअर घडवण्यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या शिबिरात युवकांना मिळणार आहेत.
आयपीएचचे संस्थापक स्व.डॉ. आनंद नाडकर्णी यांचे सहकारी तथा ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ   अरुण नाईक यांचे मौलिक मार्गदर्शन या शिबीरात लाभणार आहे.
११ जुलैला सेक्टर ५, ऐरोली येथील जानकीबाई मढवी मंगल कार्यालयात संध्याकाळी ४ वाजता हे शिबीर संपन्न होणार असून विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घेऊन करिअरविषयक योग्य दिशा निश्चित करावी असे आवाहन शिवसमर्थ पतपेढीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ७७१५९२८८८२ / ९८३३१५०४५९ / ७३०४७११८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *