बौद्ध साहित्य संशोधकांसाठी मोलाचा संदर्भग्रंथ ठरेल – ज.वि. पवार
मुंबई, प्रतिनिधी : काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकाशनास विलंब झालेल्या ‘अपरान्त’ जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ज.वि. पवार यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे उत्साहात पार पडले. बौद्ध साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करणारा हा विशेषांक अभ्यासक व संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास ज.वि. पवार यांनी व्यक्त केला.
मुंबईतील परेल येथील सोशल सर्व्हिस लिग हायस्कूल येथे अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने आयोजित विशेष प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर, सरचिटणीस व साहित्यिक सुनील हेतकर, कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीधर पवार तसेच छायाचित्रकार-साहित्यिक चंद्रकांत घाटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज.वि. पवार म्हणाले की, बौद्ध साहित्य आणि संस्कृतीचे संदर्भमूल्य जपणारा हा विशेषांक संशोधक, अभ्यासक आणि नव्या पिढीतील वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा दर्जेदार साहित्यनिर्मितीमुळे वैचारिक चळवळीला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस तथा जयंती विशेषांकाचे कार्यकारी संपादक सुनील हेतकर यांनी विशेष परिश्रम घेऊन हा दर्जेदार अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर म्हणाले की, संस्थेतील कार्यकर्त्यांसाठी हेतकर यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे विशेषांकाची गुणवत्ता अधिक उंचावली आहे.
कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीधर पवार आणि छायाचित्रकार-साहित्यिक चंद्रकांत घाटगे यांनीही विशेषांकाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सरचिटणीस सुनील
