बातमी इम्पॅक्ट
मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरानमध्ये पावसाळ्यात नालेमय बनलेल्या रस्त्यावरून पायी चालत जाणे किंवा ई रिक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणे अत्यंत जिकिरीचे बनले होते.त्यामुळे ९ रोजी प्रसिद्ध झालेल्या माथेरानच्या विकास कामांकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे”या मथळ्याखाली वृत्त आल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले असून नगरपालिका कार्यालया समोरील रस्त्यांची दुर्दशा झाली होती तो रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे.यावर्षी पहिल्यांदाच आपत्कालीन व्यवस्था बाबतीत तसेच नागरी वस्तीत जाऊन प्रशासनाने पाहणी केलेली नाही. तसेच पावसाळ्यापूर्वी गटारांची साफसफाई केली जाते ती करण्यात आलेली नसल्याने आठ दिवस सलग जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्व पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत होते यामुळेच बहुतांश रस्त्याचे नाले झाले आहेत. अन्य ठिकाणी सुध्दा रस्त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *