बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग
साउथ मुंबई मॅनियाक्सवर दोन गुणांनी मात
मुंबई, २७ ऑगस्ट: ऑलिंपिया स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सतर्फे आयोजित आणि नॉर्थ मुंबई डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या विद्यमाने खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगच्या (बीडीएल) मुंबई पर्वात, १३-वर्षांखालील मुलींच्या गटातील चुरशीच्या सामन्यात मुंबई स्नायपर्सने साउथ मुंबई मॅनियाक्सचा ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२) असा पराभव केला. या विजयात जेना सूर्याने मोलाची भूमिका बजावली.
गोरेगाव (पश्चिम) येथील विबग्योर हायस्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत स्नायपर्सच्या आक्रमणाची धुरा सांभाळणाऱ्या जेनाने सर्वाधिक २४ गुण नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. साउथ मुंबईकडून इंचारा कडलीने १७ गुण मिळवले. तत्पूर्वी, रायगड क्रॉसर्सने ४५-१९ (मध्यंतर १८-१०) असा सहज विजय मिळवला. रायगड क्रॉसर्सकडून वाणी मेनन (११ गुण), टियाना सिक्वेरा (१० गुण) आणि बरजाताने (८ गुण) सर्वाधिक योगदान दिले.
मुलांच्या गटात चुरशीच्या सामन्यात, साउथ मुंबईने मुंबई स्निपर्सवर एका गुणाने विजय मिळवला. विजेत्या संघाकडे मध्यंतरापर्यंत २९-२८ अशी निसटती आघाडी होती. त्या आधी, एका एकतर्फी सामन्यात जेबी नवी मुंबईने पुणे ग्लोबल स्पोर्ट्सवर ७१-३५ (मध्यंतर ३६-२४) असा विजय मिळवला.
निकाल (मुली): रायगड क्रॉसर्स (वाणी मेनन ११, टियाना सिक्वेरा १०, बरजाता ८) विजयी विरुद्ध नवी मुंबई स्पोर्ट्स स्ट्रायडर्स (रिया जैन ६) – ४५-१९ (मध्यंतरापर्यंत १८-१०).
मुंबई स्नायपर्स (जेना सूर्या २४) विजयी विरुद्ध साउथ मुंबई मॅनियाक्स (इंचारा कडली १७) – ३९-३७ (मध्यंतरापर्यंत १५-१२).
मुले: साउथ मुंबई मॅनियाक्स (मोईन के. २५, तनाय बदानी ९) विजयी. मुंबई स्निपर्स (जोहान जोशुआ ३०, झायाद एस. ११) – ६०-5९ (HT: २९-२८).
जेबी नवी मुंबई (अर्नेश गांगुली २5, अभिर शेट्टी १२, ज्ञान पारेख १०) पुणे ग्लोबल स्पोर्ट्स (वेदांत कदम २०) – 7१-३5 (३६-२4) असा पराभव केला.
