मीरारोड – मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले . त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले . या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
000
